*पुणे मनपा शाळा क्र. 161 मुलांची येथे
‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा*
१५ ऑक्टोबर हा डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस भारतभर वाचन प्रेरणादिन
म्हणून साजरा केला जातो. तसाच यावेळी पुणे महानगरपालिके तर्फे ‘लेखक आपल्या भेटीला ‘हा उपक्रम शाळास्तरावर राबविला गेला. यामध्ये ई – लर्निंग साहित्य असणाऱ्या व्हिडिओ काॅन्फरन्स चा वापर करून पुणे शिक्षण मंडळातून मा. लेखक न.म.जोशी , मा. शिक्षणाधिकारी माळी सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळास्तरावर विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये शाळा क्र. 161 मुलांची येथे डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना वाचनाचे होणारे फायदे,वाचन कसे करायचे त्यामध्ये प्रश्नांची असणारी महत्त्वाची भूमिका यांची महती विशद केली. यानिमित्ताने शालेय परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.
मुख्याध्यापिका सौ.सुनंदा हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा