शालेय उपक्रम

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

जागतिक दिव्यांग दिन - कार्यक्रम







🌸आज दिनाक 10/12/19 रोजी *जिल्हा शिक्षण  प्रशिक्षण संस्था व समग्र शिक्षा समावेशित शिक्षण पुणे महानगरपालिका* यांच्या संयुक्त विद्यमाने

 *🌹जागतिक दिव्यांग दिनानिमित्त 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर* या  कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची  सांगता कै.शामराव बराटे माॅडेल स्कूल शाळा क्रमांक 161बी. दिगंबर वाडी येथे करण्यात आली.

🌹या प्रसंगी विभागीय नगरसेविका  *मा.सौ दिपाली ताई धुमाळ मॅडम*
🌹जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या *मा.प्राचार्या डॉ. कमलादेवी आवटे मॅडम*

 🌹समग्र शिक्षा,पुणे म.न.पा.च्या *प्रकल्प अधिकारी मा.श्रीम. शिल्पकला रंधवे मॅडम*

🌹वारजे कर्वेनगर विभागाच्या *पर्यवेक्षिका सौ अरुणा राहींज मॅडम*

 🌹कोथरूड विभागाच्या पर्यवेक्षिका *सौ प्रतिभा खाडे मॅडम*

🌹समग्र शिक्षाचे समन्वयक *श्री चारुदत्त नेवासकर सर*

 🌹माॅडेल स्कूल शाळा क्रमांक 161 बी च्या मुख्याध्यापिका *सौ सुनंदा हांडे मॅडम*

🌹शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या बाल तज्ञ *डाॅ. हेमांगी पाटस्कर*

 🌹समग्र शिक्षा पुणे महानगरपालिकेतील *विशेष तज्ञ, विशेष शिक्षक,विषय साधन व्यक्ती* उपस्थित होते.

🌹कार्यक्रमास विभागातील म.नपा. खाजगी शाळेतील *विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेले दिव्यांग विद्यार्थी, पालक, सर्वसामान्य विद्यार्थी* यांना आमंत्रित करण्यात आले होते.

🌹 कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली.
 🌹त्यानंतर सर्वसामान्य विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थी यांनी *स्वागत गीत* सादर  केले.
 💐  विद्यार्थ्यांच्या हस्ते *सर्व मान्यवरांचे* फुलांचे रोप देऊन सत्कार करण्यात आले.
💐 विविध गुणदर्शन कार्यक्रमांमध्ये माॅडेल स्कूलच्या 161बी या शाळेतील विद्यार्थ्यांनी *समुह गीत* सादर केले.
💐शिशुविहार प्राथमिक शाळेतील *श्राव्य अध्ययन शैलीचा विद्यार्थी सनत देशपांडे व त्याच्या मित्रांनी गीतरामायण*  सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले.
💐बहु अध्ययन शैली असणारी महिलाश्रम हायस्कूल मधील *ऐश्वर्या गुरव* हिने कविता वाचन करून दाखवले तर मनपा शाळा क्रमांक 3 जी. मधील *सचिन दाभेकर* याने छोटसं गाणं म्हणून दाखवले. *सृष्टी रोहनकर* हिने नृत्य करून दाखवले तर यांना *उस्फूर्तपणे साथ सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी दिली.*

🏆🥇 *मान्यवरांच्या* हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना *प्रशस्तिपत्रके* देण्यात आली. तसेच *मा.नगरसेविका दीपालीताई धुमाळ मॅडम* यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली.
🎯 दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
💐🌹 याप्रसंगी दिव्यांग विद्यार्थी,पालक, शिक्षक यांच्याशी *सुसंवाद साधून* दिव्यांगांसाठी असणारे हक्क व त्यांच्यासाठी असणाऱ्या सोयीसवलती, समावेशित शिक्षणाचे महत्त्व याविषयीचे *महत्वपूर्ण व अनमोल* असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.
🎯सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *सौ प्रमिला तनपुरे* प्रास्ताविक *श्रीम. स्मिता सूर्यवंशी* व आभारप्रदर्शन *श्रीम.रश्मी परदेशी* यांनी केले.
🌹💐शाळेच्या मुख्याध्यापिका *सौ सुनंदा हंडे मॅडम व त्यांची संपूर्ण टीम, विशेष/ विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक* यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

गुरुवार, १७ ऑक्टोबर, २०१९

An Interview With A Teacher

An Interview Of A Teacher.

Student of standard 3rd asking questions to her teacher.

विज्ञान प्रदर्शन


विज्ञान प्रदर्शन

 

विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात विविध प्रयोग सादर केले.यावेळी पर्यवेक्षिका सौ.राहिंज मॅडम ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता.

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

Conversation

Conversation

Discussion About Exam.


वाचन प्रेरणा दिन


*पुणे मनपा शाळा क्र. 161 मुलांची  येथे
‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा*
१५ ऑक्टोबर हा डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस भारतभर वाचन प्रेरणादिन
म्हणून साजरा केला जातो. तसाच यावेळी  पुणे महानगरपालिके तर्फे ‘लेखक आपल्या भेटीला ‘हा उपक्रम शाळास्तरावर राबविला गेला. यामध्ये ई – लर्निंग साहित्य असणाऱ्या व्हिडिओ काॅन्फरन्स चा वापर करून पुणे शिक्षण मंडळातून मा. लेखक  न.म.जोशी , मा. शिक्षणाधिकारी माळी सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद  साधला. यावेळी शाळास्तरावर विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये शाळा क्र. 161 मुलांची येथे  डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून  विद्यार्थ्यांना  वाचनाचे होणारे फायदे,वाचन कसे करायचे  त्यामध्ये प्रश्नांची असणारी महत्त्वाची  भूमिका यांची महती विशद केली. यानिमित्ताने शालेय परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.
मुख्याध्यापिका सौ.सुनंदा हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्व शिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केले.

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९

Teacher's Day Celebration In Our School.....


            शिक्षकदिन साजरा करताना 7वी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून आपल्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांना शालेय विषय शिकवले.त्यांचे विविध खेळ घेतले,गाणी घेतली,गोष्टी सांगितल्या. शेवटी बालसभा घेऊन सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची माहिती सांगितली.  

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९

गुरूपौर्णिमा- बालसभा इ.8वी

गुरूपौर्णिमा 
गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेत गुरूपौर्णिमा साजरी झाली.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच सर्व शिक्षक व सेवकवर्ग उपस्थित होता.या बालसभेचे अध्यक्षस्थान इ.8वी तील विद्यार्थीनी सिमरन हिने भूषवले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूशिष्यांच्या गोष्टी सांगितल्या. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विभागाच्या नगरसेविका मा.दिपावली धुमाळ होत्या.त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन सौ.गोरे व श्री.लायगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी केले. 





बालसभा लोकमान्य टिळक पुण्यतिथी


लोकमान्य टिळक पुण्यतिथी  
इ.6वी बालसभा

एक हात मदतीचा.

       

         *पूरग्रस्तांच्यासाठी एक हात मदतीचा*
कै. शामराव श्रीपती बराटे माॅडेल स्कूल 161बी दिगंबरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टीमुळे पुणे, सांगली ,कोल्हापूर जिल्हातील विस्थापित झालेल्या नागरिकांना मदत म्हणून दैनंदिन व्यवहारातील गहू ,तांदूळ, डाळी ,साखर, बिस्किटे, मसाले, कपडे  यासारख्या वस्तूंची मदत राष्ट्रसेवा समूहकडे सुपूर्द केली. तसेच शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांच्या   संघटनेच्या माध्यमातून 5005 रूपये  रोख रक्कम जमा करून  ब्रम्हनाळ शाळेकरीता देण्यात आली.

रविवार, ७ जुलै, २०१९

गुढीपाडवा- शालाप्रवेश

गुढीपाडवा - शाळेत गुढी उभारून शाळा प्रवेशाची सुरूवात करण्यात आली. इ. 1ली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले.

आंतरराष्ट्रीय योग दिन

21 जुलै 2019
21जुलै - आंतरराष्ट्रीययोग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगासने आणि प्राणायामाचे महत्त्व सांगितले. विविध प्रकारची योगासनेतसेच प्राणायामाचे काही प्रकार विद्यार्थ्यांकडून करून घेतले. यामध्ये शाळेचे सर्व शिक्षक व सेवक सहभागी झाले होते.



प्रवेशोत्सव व पुस्तकवाटप

17 जून 2019
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.त्याचबरोबर मुख्याध्यापिका सौ.हांडे व  शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते विद्यार्थांना पुस्तक वाटप करण्यात आले.



शनिवार, ६ जुलै, २०१९

शाळेची वैशिष्ट्ये

शाळेची वैशिष्ट्ये
1) प्रशस्त पक्की तीन मजली इमारत.
2) प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकवर्ग
3) मैदान.
4) सुसज्ज प्रयोगशाळा.
5) ग्रंथालय.
6) टॅबवर अभ्यास.
7) ई - लर्निंग.
8) मोफत शिक्षण.
9) वैयक्तिक मार्गदर्शन
10) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शालेय सहशालेय उपक्रमांचे नियोजन.





पालखी सोहळा

कास्प संस्था उपक्रम

     3 जून 2019
                          स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय प्रकल्प कास्प संस्था अंतर्गत दि. ३/७/२०१९ रोजी महापौर मा. मुक्ताताई टिळक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.